Ad will apear here
Next
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’
अॅड. एस. के. जैन यांचे प्रतिपादन

पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच आपली परिस्थिती बदलण्याचे मुख्य साधन आहे,’ असे प्रतिपादन  शिक्षण प्रसारक मंडळींचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आनंद कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत आनंद कांबळे यांच्या स्मरणार्थ पुणे शहरातील पूरग्रस्त व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. एकूण १२०० विद्यार्थ्यांना हे साहित्य वितरित करण्यात आले. 


बोपोडी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश कर्पे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अॅड. आयुब शेख, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, सचिव बाबुराव घाडगे, नगरसेविका सुनिता वाडेकर, प्रकाश ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, अशोक शिरोळे, महेश कर्पे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत मुलांना शुभेच्छा दिल्या. सुनीता वाडेकर यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZYACE
Similar Posts
अतिवृष्टीबाधित जिल्हा परिषद शाळांसाठी ५७ कोटींचा निधी पुणे : ‘राज्यातील २१ जिल्ह्यांमधील दोन हजार १७७ जिल्हा परिषद शाळांना महापूराचा फटका बसला असून, त्यांची दुरुस्ती, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके व पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना ५७ कोटींचा निधी आवश्यक असून, तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून खास बाब म्हणून देण्यात येईल,’ अशी घोषणा
पूरग्रस्त मुलांना धीर देण्यासाठी ‘अक्षरनंदन’च्या विद्यार्थ्यांनी पाठवले शब्दसखे! पुणे : ‘घाबरू नका, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. महापुरासारख्या संकटाला धीराने तोंड देत तुम्ही पुन्हा आयुष्य सुरू करत आहात, हे खूप प्रेरणादायी आहे....’ हे शब्द आहेत अक्षरनंदन शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांनी पूरग्रस्त भागातील मुलांसाठी लिहिलेल्या पत्रांमधील.
युनिक स्कूलतर्फे पूरग्रस्तांना मदत पुणे : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून ईगल एज्युकेशन सोसायटीच्या युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवण्यात आली. धान्य, कपडे, टिकाऊ कोरडे खाद्यपदार्थ, चादर, शाल, रग, स्वेटर आदींचा यात समावेश होता.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसोबत दीपोत्सव पुणे : ‘शहर स्वच्छ, सुंदर आणि रोगराईमुक्त ठेवण्यात सफाई कामगारांचा वाटा महत्त्वाचा आहे. त्यांच्यामुळे आपण निरोगी आणि आनंदी आयुष्य जगतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण आहे. रोज सकाळी संपूर्ण शहर स्वच्छ करणाऱ्या या सफाई कामगारांचे जीवन अधिक सुखकर व्हावे, त्यांचे आरोग्य सुदृढ व्हावे, यासाठी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language